Home देश “17 व्या वर्षी भारताकडून कसोटीत पदार्पण, आता भाजपमध्ये प्रवेश”

“17 व्या वर्षी भारताकडून कसोटीत पदार्पण, आता भाजपमध्ये प्रवेश”

तामिळनाडू : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी राजकीय इनिंगला सुरुवात केली आहे. त्यांनी आज (30 डिसेंबर) भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवरामकृष्णन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक ते लढवणार असल्याचं बोललं जात आहे.

या पक्षप्रवेशावेळी तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष सी टी रवी हे देखील उपस्थित होते. शिवरामकृष्णन यांच्या भाजप प्रवेशावर सी टी रवी आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणात प्रवेश न करण्याच्या निर्णयावरही प्रतिक्रिया दिली. रजनीकांत हे एक दिग्गज नेते आहेत. आम्ही सर्व त्यांचा आदर करतो. रजनीकांत हे नेहमी तामिळनाडू आणि देशाच्या हिताची गोष्ट करतात, असंही सी.टी.रवी यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी-

सत्ता विश्वासघाताने मिळवता येते, पण…; भाजपची शिवसेनेवर टीका

आपला तो ‘बाब्या’, दुसऱ्याचा तो ‘कारटा’; निलेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

एवढी का तणतण करत आहेत?; आशिष शेलारांचा संजय राऊतांना टोला

“शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला?”