ठाकरे ब्रॅण्डचा जोर हवा, राज ठाकरेंनाही भविष्यात फटका बसेल- संजय राऊत

0
175

मुंबई : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगना रणाैत आणि शिवसेनेत निर्माण झालेला वाद सुरुच आहे. या वादात मनसेनं भूमिका न घेतल्यामुळे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रॅण्ड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ब्रॅण्डचे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे.

दरम्यान, शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रॅण्ड ढासळेल, त्या दिवसांपासून मुंबई ढासळायला सुरुवात होईल, असं म्हणत संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली आहे.

महत्वाच्या घडामोडी- 

मराठा आरक्षणावर कोर्टात कमी पडलो नाही, राज्य सरकार मराठा समाजासोबतच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरें

महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव, मुख्यमंत्रिपदाचा मास्क काढून उत्तर देणार- उद्धव ठाकरे

“सरकार चालवता येत नसेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”

राज्य सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here