Home महाराष्ट्र “राज्यातील दहावीच्या निकालाची तारीख जाहीर; उद्या लागणार निकाल”

“राज्यातील दहावीच्या निकालाची तारीख जाहीर; उद्या लागणार निकाल”

मुंबई : महाराष्ट्र बोर्डाचा 10 वी चा निकाल उद्या दि.16 जुलैला जाहीर होणार आहे., अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. याआधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 10 वी बोर्डाचा निकाल 15 जुलैपर्यंत लागण्याची अपेक्षा होती. मात्र आत्ता आलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल उद्या दि.16 जुलैला जाहीर होणार आहे.

असा पाहू शकता निकाल

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeduction.com

  • या वेबसाईटस वर आणि मोबाईल फोनवरुन एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.
  • निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
  • त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
  • त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल.
  • यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

तुमचे आवडते मुख्यमंत्री पाचव्या नंबरवर आहेत हे विसरू नका; रोेहित पवारांचा भाजपला टोला

“13 राज्यातील सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच BEST CM! पटकावलं नंबर 1 स्थान”

मायबाप सरकारला मला विचारायचं आहे की…; पुण्यातील घटनेवरुन चित्रा वाघ संतापल्या

“देवेंद्र फडणवीस राजकारणातील सर्वात लबाड माणुस”