Home महाराष्ट्र मायबाप सरकारला मला विचारायचं आहे की…; पुण्यातील घटनेवरुन चित्रा वाघ संतापल्या

मायबाप सरकारला मला विचारायचं आहे की…; पुण्यातील घटनेवरुन चित्रा वाघ संतापल्या

मुंबई : पुण्यामध्ये एका शिक्षकाने 12 वीचे गुण वाढवून देतो असं सांगत एका विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावरून सर्वच स्तरातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी देखील या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.

विकृती वाढत चालली आहे. सरकारचं तिकडे लक्ष नाही. एकमेकांना सांभाळून घेण्यात ते व्यस्त आहेत. मायबाप सरकारला मला विचारायचं आहे की तुमचं जर भांडण आणि सगळे देखावे संपले असतील तर आपण महिला आणि मुलींच्या प्रश्नांवर लक्ष देणार आहात का? रोज अशी विकृती वाढते आहे. यावर काही नियंत्रण आणणार आहात का?, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

राज्यातली विकृती टोकाला गेल्याचं दिसतंय. पुण्यात शिक्षकाने गुण वाढवून देण्यासाठी शरीरसुखाची मागणी केल्याचा अत्यंत किळसवाणा, घाणेरडा आणि संतापजनक प्रकार घडलाय. सध्या अशा प्रकारांची मालिकाच राज्यात घडतेय की काय असा प्रश्न मला पडतोय. ठाण्यात पालिकेचा आरोग्य उपायुक्त विश्वनाथ केळकर याने एका नर्सकडे अशी मागणी केली. साताऱ्यात गटशिक्षण अधिकाऱ्याने शिक्षिकेकडे अशी मागणी केली. बीडमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या एका अधिकाऱ्याने अनुकंपा तत्वावर काम करणाऱ्या महिलेकडे अशी मागणी केली. बीडच्या दिनरूडमध्ये शेतकरी महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला. तिने विरोध केल्यानंतर तिच्या संपूर्ण कुटुंबाला मारहाण झाली आणि पोलिसांनी त्या कुटुंबावरच गुन्हा दाखल केला”, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“देवेंद्र फडणवीस राजकारणातील सर्वात लबाड माणुस”

“….पण जनता तुम्हाला ‘पळ’ काढायला लावल्याशिवाय शांत बसणार नाही”

पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाही- चंद्रकांत पाटील

थोरात साहेब, तुम्ही आम्हांला जेवायला बोलवा, आम्ही स्वबळावर जेवायला येऊ; मुख्यमंत्र्यांचा चिमटा