Home महाराष्ट्र थोरात साहेब, तुम्ही आम्हांला जेवायला बोलवा, आम्ही स्वबळावर जेवायला येऊ; मुख्यमंत्र्यांचा चिमटा

थोरात साहेब, तुम्ही आम्हांला जेवायला बोलवा, आम्ही स्वबळावर जेवायला येऊ; मुख्यमंत्र्यांचा चिमटा

मुंबई : काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जलसंवर्धनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जलभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण झालं. या भाषणात अजित पवारांनी जेवणाचा विषय काढला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाषणाला सुरूवात केली. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या भाषणातील जेवणाचा धागा पकडून भाष्य केलं.

दादा, तुम्ही जेवणाचा विषय काढला. थोरात साहेब म्हणाले कोरोनामुळे जमलं नाही. थोरात साहेब, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा. कोरोनाची भीती बाळगू नका. आम्ही तुमच्याकडे येऊन स्वबळावर जेवू, असा टोमणा उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांना लगावला.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर सभागृहात सर्वजण हसू लागले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी लगेच सारवासारव केली. स्वबळाचा अर्थ असा नका समजू. म्हणजे आम्ही न भिता जेवायला येऊ. नाही तर उद्या जेवणावरून आघाडीत बिघाडी असं काही छापून यायचं, असं काही नाही. हा गंमतीचा भाग आहे, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.

महत्वाच्या घडामोडी –

…म्हणून नाना पटोले यांचे फोन चोरून ऐकण्यात आले- संजय राऊत

चंद्रकांत पाटील म्हणजे निरागसतेचं लेणं, एक निष्पाप बालक”

“पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेविका अर्चना बारणे यांचं निधन”

मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते; पंकजा मुंडेंचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा