Home महाराष्ट्र पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाही- चंद्रकांत पाटील

पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाही- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काल कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारणा करण्यात आली. त्यावर चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंजेनी  कार्यालयातील भाजप रस्त्यावर आणली. केवळ पत्रकं काढून भागणार नाही तर रस्त्यावर उतरलं पाहिजे या भावनेतून त्यांनी पक्ष वाढवला. अनेक संघर्ष केले. मुंडेंनी महाराष्ट्रातील भाजपला संघर्ष करणारी संघटना म्हणून ओळख निर्माण करून दिली. अशा घरात जन्मलेल्या पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

एखादी गोष्ट घडली ती आवडली नाहीतर भावना व्यक्त करण्याचा कार्यकर्त्यांना अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी भावना व्यक्त केल्या. प्रीतम ताईंना मंत्रिमंडळात घेतलं जावं हे त्यांना वाटत होतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा बारकाईने निर्णय घेतात. त्यांनी पद्म पुरस्कार देतानाही शोधून शोधून पदं दिलं, लोकांच्या ध्यानीमनीही नव्हतं अशा लोकांनाही पदं दिलं. राजकारणताही सेम आहे. संघटनात्मक जबाबदारी असो की मंत्रिपदं देणं असो त्यांनी लोकांना शोधून शोधून पदं दिलं. पक्षात समतोल साधण्याचा नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी –

थोरात साहेब, तुम्ही आम्हांला जेवायला बोलवा, आम्ही स्वबळावर जेवायला येऊ; मुख्यमंत्र्यांचा चिमटा

…म्हणून नाना पटोले यांचे फोन चोरून ऐकण्यात आले- संजय राऊत

चंद्रकांत पाटील म्हणजे निरागसतेचं लेणं, एक निष्पाप बालक”

“पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेविका अर्चना बारणे यांचं निधन”