राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे की…; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

0
494

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असून राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ? असा सवालही राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

अजित पवारांच्या शपथविधीवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

 शरद पवार यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया; म्हणाले….

मोठी बातमी! अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे किती आमदार फुटले? जाणून घ्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here