Home महाराष्ट्र अजित पवारांच्या शपथविधीवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

अजित पवारांच्या शपथविधीवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे.

राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार अशी माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्यासोबत 30 आमदार असल्याची माहिती आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवार यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया; म्हणाले….

राष्ट्रवादीचे एकूण 40 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील. संध्याकाळी 6 वाजता हा शपथविधी होईल.

सध्या प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्यासह अनेक दिग्गज नेते राजभवनात असल्याची माहिती आहे. राजभवनात शपथविधीची तयारी सुरु आहे. या सर्व प्रकरणावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.                                                                                                                                  महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले” मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.”. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही, असं संजय राऊत यांनी ट्विट मध्ये म्हटलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे किती आमदार फुटले? जाणून घ्या

महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप; अजित पवार घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ?