Home महाराष्ट्र “आज जो शपथविधीचा कार्यक्रम झाला, तो…”, राष्ट्रवादीकडून पहिली प्रतिक्रिया

“आज जो शपथविधीचा कार्यक्रम झाला, तो…”, राष्ट्रवादीकडून पहिली प्रतिक्रिया

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असून राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकारी, पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, युवक आणि महिला हे शरद पवार यांच्याबरोबर आहेत. आज जो शपथविधीचा कार्यक्रम पार पडला, तो ऑपरेशन लोटसचा भाग होता. त्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : शरद पवार यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मी….

दरम्यान, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भुजबळ यांच्यासह हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, बाबुराव अत्राम, संजय बनसोडे हे आमदार देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

शरद पवार यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मी…

मोठी बातमी! अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे किती आमदार फुटले? जाणून घ्या

महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप; अजित पवार घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ?