Home महाराष्ट्र लायकी पाहून बोलावं; सूर्यावर थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते- अजित पवार

लायकी पाहून बोलावं; सूर्यावर थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते- अजित पवार

सातारा : शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अशी टीका भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी पडळकरांवर सडकून टीका केली.

आपली योग्यता काय? आपण बोलतो काय? याशिवाय आपण कुणाबद्दल बोलतोय? सुर्याकडे पाहून थुंकल्यावर थुंकी तोंडावरच उडते. असा घणाघात अजित पवार यांनी केला.

दरम्यान, साताऱ्यात आज रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनिमित्तीने शरद पवार, अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आदी नेते साताऱ्यात उपस्थित होते. अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पडळकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला

देवेंद्र फडणवीस काहीही बोलून प्रसिद्ध मिळविण्याचा प्रयत्न करतात- शरद पवार

“पवारांचे वय, राजकीय कारकीर्द पाहता पडळकर हे डासाएवढेही नाहीत”

फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग; असं मी म्हणणार नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याचा फडणवीसांवर निशाणा