Home महाराष्ट्र “पवारांचे वय, राजकीय कारकीर्द पाहता पडळकर हे डासाएवढेही नाहीत”

“पवारांचे वय, राजकीय कारकीर्द पाहता पडळकर हे डासाएवढेही नाहीत”

मुंबई : शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अशी टीका भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावरुन  शरद पवारांचे वय, अनुभव अन् राजकीय कारकीर्द पाहता पडळकर हे डासाएवढेही नाहीत अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी यांनी केली आहे.

पडळकरांचा राजकारणातील अनुभव फारच तोकडा आहे. पडळकरांनी शरद पवारांना करोनाची उपमा दिली यावरुन त्यांची राजकीय पात्रता, मनाच क्षुद्रता आणि विचारांची पातळी लक्षात येते. पवारांचे वय, अनुभव अन् राजकीय कारकिर्दीसमोर पडळकर डासाएवढेही नाहीत. डास मारायला कोणी बंदूक वापरणार नाही. एक हीटचा फवारा भरपूर असतो, असं अनिल गोटे म्हणाले.

पडळकरांना भाजपाच्या धोकेबाजीचा झटका बसेल तेव्हाच शुद्धीवर येतील असंही ते म्हणाले आहेत. “पडळकर नव्या नवरीचा आनंद उपभोगत आहे. नवरी रुळल्यावर त्यांना झटके बसतील त्यावेळेला बाजूला स्वत:ची सावलीसुद्धा उभी राहणार नाही. माझ्या अनुभवाच्या जोरावर मी सांगतो आहे, असंही ते म्हणाले आहे.

महत्वाच्या घडामोडी-

फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग; असं मी म्हणणार नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याचा फडणवीसांवर निशाणा

‘भाजपाच्या आमदाराला हात जरी लावला तरी…’; निलेश राणेंचं राष्ट्रवादीला आव्हान

“औरंगाबाद महापालिकेत मनसेचा राडा; उपायुक्तांवर खुर्ची उगारली”

कोरोना झाल्याचं समजताच पंकजा ताईचा फोन आला आणि…; धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या भावना