Home बीड कोरोना झाल्याचं समजताच पंकजा ताईचा फोन आला आणि…; धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या...

कोरोना झाल्याचं समजताच पंकजा ताईचा फोन आला आणि…; धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या भावना

बीड : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्यानंतर आपल्यातील राजकीय मतभेद बाजूला ठेऊन पंकजा मुंडे यांनी फोन करुन लवकर बरे व्हा अशा सदिच्छा दिल्या होत्या. त्यावर धनंजय मुंडेंनी भावना व्यक्त केल्या.

मला करोना झाल्याचं कळाल्यानंतर पंकंजांनी मला फोन केला. चार-पाच वेळा त्यांनी माझी चौकशी केली. मी बरा व्हावा यासाठी सदिच्छाही व्यक्त केल्या. कुटुंबात दोन राजकीय विचारधारा याआधी आल्या आहेत. पण कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे अशी माझी नेहमी इच्छा राहिली आहे. त्या इच्छेला अनुसरुन माझ्या आजारपणाच्या काळात बहिणीने फोन केला, सदिच्छा व्यक्त केली, याचा आनंद वाटला. ज्याच्याशी इतकं वर्ष बोलणं नाही त्याने फोन करुन प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणं यामुळे नक्कीच फरक पडतो, असं धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान, 2011-12 पासून आमच्या कुटुंबात फारसा संवाद नव्हता. एखादी दु:खाची घटना असेल तर आम्ही एकत्र आलो आहोत, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…तो अति आत्मविश्वास नडला; कोरोनावर मात केल्यानंतर धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या भावना

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या सूचना द्या; मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र

देवेंद्र फडणवीस आणि माझ्याविषयी कोणीही काहीही बोलतं, हे चालतं का?- चंद्रकांत पाटील

“व्हिएतनाम येथे अडकलेल्या तरूणाच्या मदतीसाठी धावले खासदार धैर्यशील माने”