Home महाराष्ट्र “औरंगाबाद महापालिकेत मनसेचा राडा; उपायुक्तांवर खुर्ची उगारली”

“औरंगाबाद महापालिकेत मनसेचा राडा; उपायुक्तांवर खुर्ची उगारली”

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी औरंगाबाद महापालिका कार्यालयात तुफान राडा घातला.

औरंगाबादचे मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी महापालिका उपायुक्त रवींद्र निकम यांच्यासोबत गैरवर्तण केलं. दशरथ यांनी उपायुक्तांच्या अंगावर खुर्ची उगारली. मात्र, पोलिसांनी वेळीच अडवलं. अन्यथा प्रकरण जास्त चिघळलं असतं.

दरम्यान, आज उपायुक्त वाचले. अन्यथा त्यांचा आज कार्यक्रमच केला असता. ज्या पद्धतीने आज महापालिका प्रशासन काम करत आहे, ते अत्यंत नींदनीय आहे. त्यांचा मी निषेध करतो असा घणाघात दशरथे यांनी केला. तसेच महापालिकेने जर दोन दिवसात योग्य उपाययोजना नाही केल्या तर आंदोलन करु असा इशारादेखील सुहास दशरथे यांनी रवींद्र निकम यांना दिला.

औरंगाबादमध्ये सुरुवातीला दिवसाला 10 रुग्ण वाढायचे. त्यानंतर 20 झाले, 20 नंतर 50, त्यानंतर 100, आता दररोज 250 रुग्ण वाढत आहेत. दररोज 250 पेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत असतील तर महापालिका प्रशासन झोपलेलं आहे का? असा सवाल सुहास दशरथे यांनी रवींद्र निकम यांना विचारला.

महत्वाच्या घडामोडी-

कोरोना झाल्याचं समजताच पंकजा ताईचा फोन आला आणि…; धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या भावना

…तो अति आत्मविश्वास नडला; कोरोनावर मात केल्यानंतर धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या भावना

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या सूचना द्या; मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र

देवेंद्र फडणवीस आणि माझ्याविषयी कोणीही काहीही बोलतं, हे चालतं का?- चंद्रकांत पाटील