शरद पवारांबद्दल बोलताना अजित पवार झाले भावूक; म्हणाले,पवारसाहेबांचे नाव घेतल्याशिवाय…

0
585

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 81 वा वाढदिवस आहे. शरद पवार  यांच्या वाढदिवसानिमित्त सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासोहळ्यात शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना अजित पवारांचा कंठ दाटून आला होता. पवारांबद्दल  बोलताना एका क्षणी अजित पवार अत्यंत भावूक झाले होते.

हे ही वाचा : विनायक राऊतांमुळंच महाराष्ट्राची मान खाली गेली; निलेश राणेंचा हल्लाबोल

मला फार काही सूचत नाही, शब्द बाहेर पडत नाही,  पण पवारसाहेबांचे नाव घेतल्याशिवाय देशाचा आणि राज्याचा इतिहास लिहिता येणार नाही, अशी भावना व्यक्त करून आपले भाषण थांबवले. उपस्थित कार्यकर्तेही हारावून गेले होते.

दरम्यान, शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच आज देशातील विविध राजकीय पक्षातील नेत्यांनीही पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“आता मनसेचा शिवसेनेला दणका; कोकणातील अनेक शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश”

‘या नालायक सरकारच डोकं ठिकाणावर आहे का?; भाजप आमदाराची राज्य सरकारवर टीका

अप्पा, वंचितांच्या कल्याणाचा वसा आजही आमच्यात, तो प्राणपणाने जपणार; धनंजय मुंडेंची गोपीनाथ मुंडेंना आदरांजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here