Home नाशिक “ सोनिया गांधी सक्रिय नाहीत ‘UPA’चं नेतृत्व आता शरद पवारांनी करावं”

“ सोनिया गांधी सक्रिय नाहीत ‘UPA’चं नेतृत्व आता शरद पवारांनी करावं”

नाशिक : सोनिया गांधी सध्या सक्रिय राजकारणात नाहीत. त्यामुळे यूपीएचं नेतृत्व करण्यासाठी शरद पवार हे सक्षम व्यक्तिमत्व आहेत, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे. आतापर्यंत काँग्रेसने नेतृत्व केलं. देशामध्ये विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि या आघाडीमध्ये जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावे असे वाटत असेल तर यूपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, आतापर्यंत सोनिया गांधी यांनी यूपीएचं नेतृत्व चांगल्या प्रकारे केलं. मात्र, सोनिया गांधी सध्या सक्रिय राजकारणात नाहीयेत. आज अनेक प्रादेशिक पक्ष हे युपीएमध्ये नाहीयेत. पण त्यांना यूपीएमध्ये येण्याची इच्छा आहे. त्यामुळे यासाठी शरद पवार हे सक्षम नेतृत्व आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भारत विरूद्ध इंग्लंड पाचवा टी-20 सामना! इंग्लंडने टाॅस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

“रात्री 50 मिनिटं व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होतं, मात्र बंगालमध्ये गेल्या 50 वर्षांपासून विकास डाऊन”

“मिस्बाह उल-हक म्हणजे गरीबांचा एम.एस.धोनी”

“…तर ठाकरे सरकार मृतवत म्हणावे का?; लवकरच तेरावं घालावं लागेल”