Home देश “रात्री 50 मिनिटं व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होतं, मात्र बंगालमध्ये गेल्या 50 वर्षांपासून विकास...

“रात्री 50 मिनिटं व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होतं, मात्र बंगालमध्ये गेल्या 50 वर्षांपासून विकास डाऊन”

नवी दिल्ली : येत्या काही महिन्यांवर 5 राज्यातील विधानसभा निवडणुका आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच खडगपूर येथे झालेल्या एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचा धागा पकडत ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम 50 ते 55 मिनिटांसाठी डाऊन झालं होतं. अनेक जण यामुळे चिंतेत होते. जवळजवळ तासभर त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. बंगालमध्ये विकास, लोकांची स्वप्न आणि सरकारवरील विश्वास हे सगळं गेल्या 50 ते 55 वर्षांपासून डाऊन झालं असल्याचं म्हणत मोदींनी ममता बॅनर्जींवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मिस्बाह उल-हक म्हणजे गरीबांचा एम.एस.धोनी”

“…तर ठाकरे सरकार मृतवत म्हणावे का?; लवकरच तेरावं घालावं लागेल”

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खूप अभ्यास केलाय; आम्हा डॉक्टरांपेक्षाही त्यांना कोरोनाचं जास्त ज्ञान”