Home नाशिक “काही लोक केवळ भगवा मिरवताय, पण…”; हिंदुत्वावरून फडणवीसांनी शिवसेनेला डिवचलं

“काही लोक केवळ भगवा मिरवताय, पण…”; हिंदुत्वावरून फडणवीसांनी शिवसेनेला डिवचलं

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेने जेव्हापासून घरोबा सुरू केलाय. तेव्हापासून भाजप शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यारून हिणवताना दिसून येत आहे. अशातच आज नाशिकमध्ये भाजपचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाला हिंदुत्वावरून पुन्हा डिवचलं आहे.

देवेंद्र फडणवीस आज औरंगाबाद आणि नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी नाशिक महानगरपालिकवर भगवा फडकवा असं आवाहन करत भगव्याची जबाबदारी आता फक्त भाजपवर आहे. बाकीचे काय करत आहेत हे तुम्ही पाहत आहात, असा टोला शिवसेनेला लगावला आहे.

हे ही वाचा : “मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेचं पथक दाखल”

आपल्या सगळंयाचा उत्साह बघता माझ्या मनात कुठलीही शंक नाही, की पुन्हा एकदा नाशिक महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकेल. जाणीवपूर्वक भाजपाचा भगवा म्हणतोय, भगवा तर छत्रपतींचा आहे. परंतु तो छत्रपतींचा भगवा सुरक्षित ठेवायची जबाबदारी आता केवळ आणि केवळ भाजपावर आलेली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, काही लोक केवळ भगवा मिरवताय, पण पाठीमागे कोणाकोणासोबत जाताय हे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे भगव्याचं रक्षण करायची आणि भगवा फडकतच राहिला पाहिजे, या महाराष्ट्रात ही जबाबदारी भाजपाने घेतली आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या भरवशावर घेतली आहे., असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“महाविकास आघाडीने भाजपचा सुपडा केला साफ; उस्मानाबाद जिल्हा बॅंकेवर सर्व 15 जागांवर मारली बाजी”

मनसे सोडून जाणाऱ्यांना बघून घेऊ; कार्यकर्ता मेळाव्यात आमदार राजू पाटील यांचा सज्जड दम

“मनसेचा ‘एकला चलो रे नारा’; दिव्यात आता मनसे पूर्ण ताकदीनं लढणार”