Home महाराष्ट्र …तर शिवसेनेचं धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडे; कायदेतज्ञ उज्वल निकम यांचं मोठं विधान

…तर शिवसेनेचं धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडे; कायदेतज्ञ उज्वल निकम यांचं मोठं विधान

736

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना पक्षात लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेना लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देणार आहे. तर भाजपही उमेदवार देणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकरणावर आता विशेष कायदेतज्ञ वकील उज्वल निकम यांनी एक मोठं विधान केलं आहे.

हे ही वाचा : शिंदे गटात प्रवेश केलेल्या वरळीतील ‘त्या’ शिवसैनिकांची शिवसेनेत गृहवापसी? ठाकरेंसोबत असल्याची दिली ग्वाही

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत जर शिंदे गटाने उमेदवार दिला नाही, तर उद्धव ठाकरे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळू शकते, असा दावा उज्वल निकम यानी यावेळी केला. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात ही बाब स्पष्ट केली आहे की, निवडणूक चिन्ह किंवा राजकीय पक्षाची मान्यता हा विषय केंद्रीय निवडणूक आयोगानं सोडवायचा आहे. त्यामुळे अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कोणते पक्ष उभे राहणार आहेत? ते बघावं लागेल, असंही उज्वल निकम म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

…तर मी उद्धव ठाकरेंच्या दसऱ्या मेळाव्याला प्रमुख पाहूणा म्हणून जाईन; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं मोठं विधान

शिंदे गट आणि ठाकरे गट येणार आमने-सामने; या ठिकाणी होणार पहिली निवडणूक

शिवसेनेत पक्षप्रवेशाचे वादळ; औरंगाबादेत विविध पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश