Home महत्वाच्या बातम्या शिंदे गट आणि ठाकरे गट येणार आमने-सामने; या ठिकाणी होणार पहिली निवडणूक

शिंदे गट आणि ठाकरे गट येणार आमने-सामने; या ठिकाणी होणार पहिली निवडणूक

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

या निवडणुकीच्या माध्यामतून शिंदे गट शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. वर्षा निवासस्थानी सध्या शिंदे गटाच्या लीगल टीमची बैठक सुरु आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी लढा देण्याबाबत या बैठकीत चर्चा होत आहे.

हे ही वाचा : शिवसेनेत पक्षप्रवेशाचे वादळ; औरंगाबादेत विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश 

दरम्यान, अंधेरी पोट निवडणुकीच्या माध्यमातून मुंबईत पहिली आरपारची लढाई होत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून या पोटनिवडणूकीत शिवसेना आणि शिंदे गट-भाजप यांच्यात लढत होणार आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार?; गिरीश महाजनांनी केला मोठा दावा, म्हणाले…

खासदार धैर्यशील मानेंना माजी खासदार केल्याशिवाय शांत बसणार नाही; शिवसेनेच्या नेत्याचा इशारा

…म्हणून हॅलो नाही, वंदे मातरम् म्हणायचं; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण