Home महाराष्ट्र …म्हणून हॅलो नाही, वंदे मातरम् म्हणायचं; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण

…म्हणून हॅलो नाही, वंदे मातरम् म्हणायचं; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी फोनवर हॅलो नव्हे- वंदे मातरम्’ अभियानाची घोषणा केली होती. याचा अध्यादेश शनिवारी काढण्यात आला. त्यानंतर आज वर्ध्यातून या नव्या अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘वंदे मातरम् परत आपल्याला आपल्याला व्यवहारात आणायचे आहे. हॅलो ऐवजी वंदे मातरम् असा वापर करून गुलामगिरीच्या निशाणी पुसून टाकायच्या आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी वंदे मातरम् मोहिमेचा शुभारंभ केला आहे.

हे ही वाचा : …तर दुसऱ्या दिवशी शिंदे सरकार कोसळेल; एकनाथ खडसेंचा दावा

‘वंदे मातरम् हा स्वातंत्र्याचा मुलमंत्र होता. बंगालची फाळणी झाली होती. त्यावेळी हजारो लोक उपस्थितीत होते. त्यावेळी लोकांची गर्दी होती, नेत्याची वाट पाहत होती. त्यावेळी एकाने वंदे मातरम् अशी घोषणा दिली. त्यानंतर सर्वच लोकांनी वंदे मातरम् ची घोषणा दिली आणि या घोषणेनंतर बंगालची फाळणी हाणून पाडली. त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक क्रांतीकारक, स्वातंत्र्यसैनिकांसाठी वंदे मातरम् हा मंत्र झाला. भगतसिंग फासावर गेले होते, त्यावेळी त्यांनी मातृभूमीचे नाव घेतले आणि वंदे मातरम् म्हणून याच भारतमातेच्या चरणी सेवा करण्यासाठी जन्म मिळावा अशी प्रार्थना केली होती, असंही फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; वरळीतील अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

शिवसेनेचा शेवट जवळ आला आहे; नारायण राणेंचं मोठं वक्तव्य

“शिवसेनेचा काँग्रेसला धक्का; ‘या’ आक्रमक नेत्यानं उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांंधलं शिवबंधन”