Home महाराष्ट्र शिंदे गटात प्रवेश केलेल्या वरळीतील ‘त्या’ शिवसैनिकांची शिवसेनेत गृहवापसी? ठाकरेंसोबत असल्याची दिली...

शिंदे गटात प्रवेश केलेल्या वरळीतील ‘त्या’ शिवसैनिकांची शिवसेनेत गृहवापसी? ठाकरेंसोबत असल्याची दिली ग्वाही

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केलं, यानंतर राज्यात शिंदे गटाविरूद्ध ठाकरे गट झाला आहे. यानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाचा दसरा मेळावा कोणाचा होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतानाच, काल एक मोठी उलथापालथ बघायला मिळाली.

वरळीतील जवळपास 500 शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारी निवासस्थान वर्षावर शिंदे गटात प्रवेश केला. मात्र सायंकाळी याच शिवसैनिकांनी आमदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटत, आपण शिवसेनेसोबतच असल्याची ग्वाही दिली.

हे ही वाचा : …तर मी उद्धव ठाकरेंच्या दसऱ्या मेळाव्याला प्रमुख पाहूणा म्हणून जाईन; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं मोठं विधान

दरम्यान, सकाळच्या उलथापालथानंतर वरळीच्या कोळीवाड्यातील सर्व शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, नगरसेवक, उपविभागप्रमुख त्या सर्व शिवसैनिकांना घेऊन मातोश्रीवर दाखल झाले. त्यानंतर शिवसेनाप्रमुखांच्या आसनासमोर नतमस्तक होऊन एकनिष्ठतेची शपथ घेतली व आपण उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिंदे गट आणि ठाकरे गट येणार आमने-सामने; या ठिकाणी होणार पहिली निवडणूक

शिवसेनेत पक्षप्रवेशाचे वादळ; औरंगाबादेत विविध पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार?; गिरीश महाजनांनी केला मोठा दावा, म्हणाले…