Home महाराष्ट्र …म्हणून संजय राठोड यांचा मंत्रीमंडळात समावेश केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खुलासा

…म्हणून संजय राठोड यांचा मंत्रीमंडळात समावेश केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खुलासा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या महिनाभरापासून रखडलेल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. यात शिंदे गटातील संजय राठोड यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर अनेक नेत्यांनी राठोड यांना मंत्रीपद दिल्यानंतर नाराजी व्यक्त केली. यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाविकासआघाडी सरकारच्या काळात पोलिसांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिली होती, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच, यानंतरही कुणाचे काही विचार असेल, म्हणणं असेल तर नक्की सांगा, ते ऐकून घेतलं जाईल. लोकशाहीत प्रत्येकाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असंही शिंदे म्हणाले.

हे ही वाचा : मुतायचे लय वांदे हायेत म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला संजय शिरसाट यांचं भन्नाट उत्तर, म्हणाले…

सर्वांना माहिती आहे की, पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास केला. त्या तपासात काहीच निष्पन्न झालं नाही. त्यामुळे त्यांना क्लीन चिट देण्यात आली. म्हणून राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे, असं स्पष्टीकरण शिंदेेंनी यावेळी दिलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

एका संजयने मविआ सरकार बुडवलं, आता मंत्रीमंडळातील संजय, या सरकारचं…; मनसेचा टोला

रंगभूमीवरचा हरहुन्नरी अभिनेता हरपला; ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन