Home महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या महिनाभरापासून रखडलेल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. यात भाजप आणि शिंदे गटाकडून 18 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र या मंत्रीमंडळ शपथविधीला भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. त्यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नवनिर्वाचित मंत्री मंडळातील सर्व मंत्री महोदय यांचे अभिनंदन…. महाराष्ट्र अपेक्षा ठेवून पाहत आहे आपल्याकडे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा… विकास आणि विश्वास याची जोड ठेवून तुम्ही सर्व जण काम करून महाराष्ट्र राज्याची भरभराट कराल अशी शुभकामना , असं पंकजा मुंडेंनी ट्विटमध्ये म्हटलं.

हे ही वाचा : एका संजयने मविआ सरकार बुडवलं, आता मंत्रीमंडळातील संजय, या सरकारचं…; मनसेचा टोला

दरम्यान, या मंत्रीमंडळ विस्तारात भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, विजयकुमार गावित, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा आणि सुरेश खाडे या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिंदेंकडून संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत, संजय राठोड, दीपक केसरकर, दादा भुसे आणि तानाजी सावंत यांची मंत्रिपदावर वर्णी लागली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

रंगभूमीवरचा हरहुन्नरी अभिनेता हरपला; ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

मंत्रीपद आमचा हक्क; तो आम्ही मिळवणारच; शिंदे गटातील बच्चू कडूंची गर्जना

“बंडखोरीचा सेनेला फायदा; राज्यभर नेटवर्क असलेल्या ‘या’ डॅशिंग युवा नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”