मुंबई : आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज या भेट घेतली. यावेळी बोलताना प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला जी मदत लागेल ती द्यायला आम्ही तयार आहोत. पण तोपर्यंत सरकारने एक अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढा. नाही तर मराठा तरुणांबरोबर आम्हालाही उपोषणाला बसावं लागेल, असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.
महत्वाच्या घडामोडी-
“आम्ही देखील याच देशाचे आहोत; आमचीही जनगणना करा…”
राहुल गांधी यांनी शिवसेनेला जागा दाखवली- अतुल भातखळकर
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत”
…हे शिवसेनेचे कोणतं हिंदुत्व?; राम कदमांचा सवाल