…म्हणून मी त्यावेळी डोळा मारला; अखेर अजित पवारांनी केला खुलासा

0
463

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा अलीकडेच डोळा मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यारून जोरदार चर्चा रंगली होती. यावर आता अजित पवार यांनी याबाबत खुलासा केला आहे.

माझं त्या दिवशी पोडियमवर बोलणं झालं होतं. त्यावेळी पाठीमागून कुणी तरी सांगितलं, उद्धव ठाकरे आले आहेत. त्यामुळे मी बाजूला झालो. त्यावेळी मी एक डोळा मारला आहे. त्याच्यात काय झालं. एक पत्रकार मित्र होता, तो मला एकच प्रश्न आहे, तो विचारू द्या, असं म्हणत होता, मी त्याला म्हटलं थांब रे, साहेबांचं होऊ दे मग मी बोलतो. असं ते झालं होतं. बोलताना थांब म्हणण्याऐवजी, डोळा मारला., असा खुलासा अजित पवार यांनी यावेळी केला. अजित पवारांनी न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी हा खुलासा केला.

हे ही वाचा : उध्दव ठाकरेंना मोठा धक्का; ठाकरे गटातील ‘या’ मोठ्या नेत्याच्या पुत्राने केला शिंदे गटात प्रवेश

दरम्यान, आता त्या व्हिडीओचा एवढा गाजावाजा केला की, अजितदादांनी डोळा का मारला, वेगवेगळ्या प्रकारची चर्चा रंगली. त्याला अर्थच नाही, असं अजित पवार म्हणाले. पण, हे का झालं, अलीकडच्या काळात चॅनल जास्त झाले आहे, जास्त आणि काहींना काही दाखवा लागतं. 13 कोटी जनतेमधील काही लोकांपैकी लाईक तरी करतील. कधी कधी काही गोष्टी सत्यता न पारखता दाखवलं जात असतं, याचा माध्यमांनी विचार करावा, असा सल्लाही अजित पवारांनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या घडामोडी –

शिवसेनेत दोन गट पाडणं, हे भाजपचच मिशन; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं वक्तव्य

“ठाकरेंच्या ताकदीत वाढ; शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ शिवसैनिकांची पुन्हा ठाकरेंकडे घरवापसी”

 “अहमदनगरमध्ये भाजपची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here