Home महाराष्ट्र अजित दादांमुळं गप्प, अन्यथा किरीट सोमय्यांना…; साताऱ्यातील सभेत बोलताना शशिकांत शिंदे आक्रमक

अजित दादांमुळं गप्प, अन्यथा किरीट सोमय्यांना…; साताऱ्यातील सभेत बोलताना शशिकांत शिंदे आक्रमक

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यातील शेतकरी मेळाव्यात बोलताना भाजप आणि किरीट सोमय्यांवर जोरदार टीका केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी म्हटलं होतं, मला परवानगी द्या, बेछूट आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांना मी पाहून घेतो. पण दादांनी सांगितलं शांततेने घ्या, म्हणून मी शांत बसलो, असं म्हणत शशिकांत शिंदे किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला. तसेच भाजपचं माझ्यावर अजूनही प्रेम आहे. मला 100 कोटींची ऑफर दिली, असा गौप्यस्फोटही शिंदेंनी यावेळी केला.

हे ही वाचा : “मुंडे भगिनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण”

दरम्यान, आम्ही ईडीला पळवून लावणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. मागे इकडे किरीट सोमय्या आले होते. मी दादांना म्हटलं होतं, मला परवानगी द्या, त्यांना मी बघून घेतो, पण दादांनी सांगितलं सबुरीने घ्या. म्हणून शांत बसावं लागलं, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“जयंत पाटलांनी चंद्रकांत दादांवर टीका करण्यापेक्षा एवढ्या वर्षांच्या मंत्रीपदात काय दिवे लावले याचं उत्तर द्यावं”

देगलूरमध्ये भाजपला आघाडी द्या, मी तुम्हांला गाव जेवण देतो; चंद्रकांत पाटलांची कार्यकर्त्यांना अनोखी ऑफर

आमचं ठरलंय, भाजपसोबत जायचं नाही; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचं मोठं विधान