Home क्रीडा “श्रेयस अय्यर ठरला हिरो, टीम इंडियाकडून श्रीलंका क्लीन स्विप, मालिका 3-0 ने...

“श्रेयस अय्यर ठरला हिरो, टीम इंडियाकडून श्रीलंका क्लीन स्विप, मालिका 3-0 ने घातली खिशात”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

धर्मशाळा : आजचा भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा 6 विकेट्ने पराभव करत मालिका 3-0 ने खिशात घातली.

श्रीलंकाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 विकेट गमावत 146 धावा केल्या. श्रीलंकेकडून  कर्णधार दसून शनाकाने सर्वाधिक 38 चेंडूत नाबाद 74 धावांची विस्फोटक खेळी करत श्रीलंकेला 146 धावांची सन्मानजनक धावसंख्या उभी करून ठेवली. शनाकाच्या या खेळीत 9 चाैकार व 2 षटकारांचा समावेश होता. तर भारताकडून आवेश खानने 2 तर मोहम्मद सिराज, हर्षेल पटेल, व रवी बिष्णोईन प्रत्येकी 1 विकेट घेतली.

हे ही वाचा : “मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंवर सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

दरम्यान, धावांचा पाठलाग करताना भारताने हे लक्ष्ये 16.5 षटकात 4 विकेट गमावत पूर्ण केलं. भारताकडून श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा शानदार खेळी करताना सलग या मालिकेतील तिसरे अर्धशतक झळकावलं. अय्यरने 45 चेंडूत 73 धावांची नाबाद विस्फोटक खेळी केली. अय्यरच्या या खेळीत 9 चाैकार व 1 षटकारांचा समावेश होता. तर रवींद्र जडेजाने 15 चेंडूत नाबाद 22 धावांची खेळी करत अय्यरसह भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचं योगदान दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

2024 मध्ये शिवसेना दिल्लीच्या तख्तावर बसणार म्हणजे बसणारच; आदित्य ठाकरेंनी फोडली डरकाळी

“सर जडेजा-श्रेयस अय्यरची विस्फोटक मॅच विनिंग खेळी, भारताचा श्रीलंकेवर 7 विकेट्सने दणदणीत विजय”

मराठी भाषावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्व पक्षांना खडसावलं, म्हणाले…