Home महाराष्ट्र 2024 मध्ये शिवसेना दिल्लीच्या तख्तावर बसणार म्हणजे बसणारच; आदित्य ठाकरेंनी फोडली डरकाळी

2024 मध्ये शिवसेना दिल्लीच्या तख्तावर बसणार म्हणजे बसणारच; आदित्य ठाकरेंनी फोडली डरकाळी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्तावर शिवसेना बसणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.

गजानन किर्तीकर म्हणाले, मुंबईचं महत्त्व कमी केलं जात आहे. सगळं दिल्लीला नेण्याचा डाव आहे. पण 2024 मध्ये आपण सर्व दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच, अशी आदित्य ठाकरे यांनी यावेळी डरकाळी फोडली. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : “सर जडेजा-श्रेयस अय्यरची विस्फोटक मॅच विनिंग खेळी, भारताचा श्रीलंकेवर 7 विकेट्सने दणदणीत विजय”

मी दिल्लीत जे बोललो ते उत्तर प्रदेशातही बोललो. इथेही तेच सांगत आहे. महाराष्ट्रातून अनेक गोष्टी हलविण्याचे डाव सुरू आहेत. पण 2024 ला शिवसेना तिथे बसेल आणि सगळं थांबवेल. शिवसेना प्रत्येक राज्याला न्याय देईल. केंद्रीय एजन्सीचं जे काम सुरू आहे, ते केवळ प्रचारासाठीच सुरू आहे. कोणतंही राज्य त्याला घाबरणार नाही, झुकणार नाही. प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढेल. भूमिपुत्रांना न्याय देई, असंही आदित्य यांनी सांगितलं.

दरम्यान, मराठीचं काय होणार याची आजच्या दिवशी चिंता करत बसण्यापेक्षा आजचा दिवस साजरा करुया. मराठी भाषा दिल्लीच्या तख्तापुढे झुकली नाही आणि आजही मराठी दिल्लीपुढे झुकणार नाही, असं परखड मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.

महत्वाच्या घडामोडी –

मराठी भाषावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्व पक्षांना खडसावलं, म्हणाले…

आदित्य ठाकरेंचं राजकीय भवितव्य कसं असेल?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले…

“नाशिकमध्ये शिवसेनेचा भाजपला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यांनी हाती बांधलं शिवबंधन”