“राज्य सरकारने संभाजी भिडेंना अटक करावी?”

0
390

पुणे : शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांना अटक करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारकडे केली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

खरे नक्षलवादी आहेत त्यांना पकडलंच पाहिजे. संभाजी भिडे आणि धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विरोधक करत होते. मग आता त्यांच्यावर राज्य सरकार कारवाई का करत नाही, असा सवालही रामदास आठवले यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, सरकार येऊन एक वर्ष पुर्ण झालं आहे मग सरकार मूग गिळून गप्प का आहे? कारवाई करायला पाहिजे. आता त्यांनी अटक करावी, असं रामदास आठवले म्हणाले. तसेच यावर्षी कोरोनामुळे भीमा-कोरेगावला येऊ नका. घरातच सर्वांनी प्रार्थना करावी. 1 जानेवारील मी सकाळी 11 वाजता तिथं जाऊन अभिवादन करणार आहे, असंही आठवले म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

ईडी नोटीसवरुन संजय राऊतांचा भाजपला टोला; म्हणाले…

काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा आमच्यासोबत येतील- रामदास आठवले

संजय राऊत यांच्या पत्नीला ‘ईडी’ची नोटीस

महाराष्ट्र भाजप रेटून खोटं बोलण्यात इतकी पुढं गेलीय की…; रोहित पवारांची भाजपवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here