Home महाराष्ट्र औरंगाबादेत शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का; भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेत

औरंगाबादेत शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का; भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेत

1177

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : औरंगाबाद  जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी भाजपचे रावसाहेब दानवे यांना मोठा धक्का दिला होता. आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांनी दानवेंना आणखी एक जबर धक्का दिला आहे.

सोयगाव नगरपंचायतीतील भाजपचे 4 नवनिर्वाचित सदस्य सत्तार यांनी शिवसेनेत खेचून आणले आहेत. त्यामुळे भाजपसाठी आणि पर्यायाने दानवेंसाठी ही मोठी नामुष्की ठरू शकते.

हे ही वाचा : BUDGET 2022 : हा अर्थसंकल्प कमी आणि जाहीरनामा जास्त वाटतोय; आदित्य ठाकरेंची टीका

शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही निवडणुकी प्रतिष्ठेची ठरली होती. अटीतटीच्या या लढतीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. नगरपंचायतीच्या 17 पैकी 11 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला होता. आता भाजपकडील 6 पैकी चार नगरसेवक शिवसेनेने आपल्याकडे वळवले आहेत.

दरम्यान, त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी आणखी डावपेच आखून भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेकडे वळवले. या चार नगरसेवकांचा आता औपचारिक प्रवेश झाला असून लवकरच ही प्रक्रिया अधिकृत होईल.

महत्वाच्या घडामोडी –

‘…मात्र आम्ही तत्वं विकून दुसऱ्या सोबत गेलो नाही’; मनसेची शिवसेनेवर टीका

नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेरच निलेश राणेंची पोलिसांशी बाचाबाची

“मनसेत सुसाट इनकमिंग; जालन्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी केला मनसेत प्रवेश”