Home महाराष्ट्र ‘…मात्र आम्ही तत्वं विकून दुसऱ्या सोबत गेलो नाही’; मनसेची शिवसेनेवर टीका

‘…मात्र आम्ही तत्वं विकून दुसऱ्या सोबत गेलो नाही’; मनसेची शिवसेनेवर टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका पॅन पद्धतीने होणार आहे. कल्याण डोंबिवली महानगर निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762 इतकी गृहीत धरून प्रभाग रचना करण्यात आली आहे. यावरुन मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

जिसकी लाठी उसकी भैस 2010 साली केडीएमसीत आम्ही दोन नंबरचा पक्ष होतो. मात्र आमची तत्वे विकून दुसऱ्या सोबत गेलो नाही. म्हणून सत्तेत बसलो नाही कोणी कितीही वार्ड रचना फोडू द्या. यावेळी लोक आम्हाला अपेक्षेने मतदान करतील, असं वक्तव्य मनसे आमदार राजू पाटील यांनी केलं आहे.

हे ही वाचा : नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेरच निलेश राणेंची पोलिसांशी बाचाबाची

वार्ड रचना आधीच फुटली आहे. याचे उमेदवारही ठरले आहेत. तुम्ही यांचे कार्यक्रम बघा. ते कोणाला घेऊन कसे चालताहेत. ठीक आहे. त्यांचे काम ते करत आहेत. आम्ही आमचे काम करू. फायदा तोटा घेऊन आम्ही लोकांसमोर जात नाही. लोकांना वाटले मनसे पक्ष योग्य आहे तर लोक आम्हाला मतदान करणार. म्हणजे सत्ताधाऱ्यांनी कामे केली नाही. त्यामुळे त्यांच्या मनासारखी प्रभाग रचना करुन घेतली आहे. याचा मनसेला काही फरक पडणार नाही, असंही राजू पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर घोषणा केल्या जातात. त्या पूर्ण होतात का याबाबत स्वत: लोकांनी डोकं लावावं. भावनिक होण्यापेक्षा प्रॅक्टिकल व्हावं, असं आवाहनही मनसे आमदार राजू पाटील यांनी आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मनसेत सुसाट इनकमिंग; जालन्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी केला मनसेत प्रवेश”

छगन भुजबळांकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं खास स्वागत; राजकीय चर्चांना उधाण

मी तर म्हणते शिवसेनेच्या एकेकाला ठोका, सोडू नका; भाजप खासदार पूनम महाजन यांचा हल्लाबोल