Home महाराष्ट्र नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेरच निलेश राणेंची पोलिसांशी बाचाबाची

नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेरच निलेश राणेंची पोलिसांशी बाचाबाची

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : भाजपा आमदार नितेश राणे यांना कोर्टाने मोठा दणका दिलाय. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायलयाने फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेरच राणे समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं चित्र पहायला मिळालं.

हे ही वाचा : “मनसेत सुसाट इनकमिंग; जालन्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी केला मनसेत प्रवेश”

जामीन अर्ज फेटाळल्याचा निकाल न्यायालयाने दिल्यानंतर नितेश राणे न्यायालयाबाहेर येऊन आपल्या गाडीमध्ये बसले. त्यानंतर त्यांची गाडी पोलिसांनी अडवून ठेवली. त्यामुळे नितेश राणे यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे चांगलेच संतापले आणि गाडी का अडवली असा जाब विचारु लागले. “कुठल्या अधिकाराखाली गाडी थांबवलीय सांगा,” असं म्हणत निलेश राणेंनी पोलिसांना सवाल केला.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून 10 दिवसांचं संरक्षण दिलेलं असल्याने नितेश राणेंना अटक करता येणार नाही असा दावा राणे समर्थक करत होते.

महत्वाच्या घडामोडी –

छगन भुजबळांकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं खास स्वागत; राजकीय चर्चांना उधाण

मी तर म्हणते शिवसेनेच्या एकेकाला ठोका, सोडू नका; भाजप खासदार पूनम महाजन यांचा हल्लाबोल

“राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी कोरोनाला हरवलं, अवघ्या 7 दिवसांतच केली कोरोनावर मात”