“नामर्दांना शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल”

0
333

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. तसेच नामर्दांना शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल, असा टोलाही राऊतांनी यावेळी लगावला.

भाजपची 3 लोकं सतत ईडीच्या कार्यालयात जात आहेत. माझ्याकडे पुरावे आहेत. पुराव्यांशिवाय मी बोलत नाही. वेगवेगळ्या मार्गांनी मला धमकावलं, पण मी त्यांचा बाप आहे, असं म्हणत राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला.

दरम्यान, महाराष्ट्राचं सरकार टिकू देऊ नका असा इशारा भाजपचे नेते देत आहेत. तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका. हे सरकार आम्ही कोणत्याही परिस्थितीत पाडायचं ठरवलं आहे, असं भाजप नेते म्हणत आहेत. पण बायकांच्या पदराआडून लढाईची मोहीम तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राऊतांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी-

…तर हे माझे शेवटचे आंदोलन असेल; अण्णा हजारेंचा केंद्र सरकारला इशारा

“ईडीची कारवाई राजकीय हेतूने, आम्ही कुणालाही घाबरत नाही”

“मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी सर्वात आधी माझ्या पक्षाने केली”

शरद पवार यांना पाठवलेली नोटीस का मागे घेतली?- नवाब मलिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here