Home महाराष्ट्र शिवसेनेनं आपलं हिंदुत्व सोडलं आहे का?, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला सवाल

शिवसेनेनं आपलं हिंदुत्व सोडलं आहे का?, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला सवाल

मुंबई : एवढी लाचार शिवसेना कधीच पाहिली नाही, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काँग्रेसनं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे. तरी शिवसेना हे सर्व सहन करत आहे. शिवसेनेनं आपलं हिंदुत्व सोडलं आहे का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

विधानसभेच्या अधिवेशनात भाजपने सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव आणला होता. पण, विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे भाजप आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान, शिदोरी मासिकातून सावरकारांचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे या मासिकावर बंदी आणावी, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा पलटवार, म्हणतात…

“उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडून हेक्टरी आणि गुंठेवारीतील फरक समजून घ्यावा”

“हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, त्यामुळे शिवसेना-भाजपनं एकत्र यावं”

भाजपचा ‘हा’ नेता म्हणतो…कदाचित अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचंय