Home महाराष्ट्र “उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडून हेक्टरी आणि गुंठेवारीतील फरक समजून घ्यावा”

“उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडून हेक्टरी आणि गुंठेवारीतील फरक समजून घ्यावा”

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हेक्टरी आणि गुंठेवारीतील फरक कळत नाही. त्यांना केवळ मुंबईतील जमिनीच्या किमती कळतात. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हेक्टरी आणि गुंठेवारीतील फरक समजून घ्यावा, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

भाजपने मंगळवारी शेतकरी आणि महिला अत्याचाराच्या प्रश्नावर राज्यव्यापी आंदोलन केलं. त्यावेळी  बोलताना त्यांनी मुख्यमंत्री आणि सरकारला लक्ष्य केलं.

आघाडी सरकार जनतेला फसवून सत्तेत आलं आहे. जनादेश नसताना सत्तेसाठी आकड्यांची जुळवाजुळव करून आणि अभद्र आघाडी करून सरकार स्थापन केलं. कर्जमाफीच्या नावाखाली या सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

अतिवृष्टीग्रस्त आणि अवकाळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत देऊ, असा शब्द ठाकरे यांनी दिला होता. पण, सत्तेत आल्यानंतर त्यांना त्याचा विसर पडला, असा आरोपही पाटीलांनी केला.

महत्वाच्या घडामोडी-

“हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, त्यामुळे शिवसेना-भाजपनं एकत्र यावं”

भाजपचा ‘हा’ नेता म्हणतो…कदाचित अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचंय

आता बळीचं राज्य आलं, शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

देवेंद्रजी, विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा; शिवसेनेचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला