राणे पिता पुत्रांवर शिवसेनेने केली सडकून टीका; दिली लाल तोंडाच्या माकडांची उपमा

0
303

मुंबई : राम मंदिराच्या कामाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 5 ऑगस्ट रोजी होणार आहे.. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली जात होती. यादरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला शिवसेना नगरसेवक  आणि स्थायी समिती अध्यक्ष, यशवंत जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

कोणत्याही घाटात लाल तोंडाची माकडे दिसतात. त्यातली तीन चुकून राजकारणात आली. या फांदीवरून त्या फांदीवर ती उड्या मारत असतात. आता सगळ्या फांद्या संपल्या पण यांच्या उड्या काही संपत नाहीत. पुढची उडी कुठे मारतात ते त्या “नारायणास”च ठाऊक, असं म्हणत यशवंत जाधव यांनी राणे पिता पुत्रांवर टिकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, या संदर्भात त्यांनी ट्विट करत राणेंवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प नाही; माझ्या डोळ्यांसमोर माझी माणसं तळमळताना पाहू शकत नाही- उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीस यांना अमृता फडणवीसांकडून खास शुभेच्छा; म्हणाल्या…

कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवणारच; राज्य सरकारने काढलेल्या जीआरवर प्रविण दरेकरांची टीका

देशात ‘अमर,अकबर, अँथनी’ एकत्र राहू नयेत असं भाजपाला वाटतं- सत्यजीत तांबे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here