मी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प नाही; माझ्या डोळ्यांसमोर माझी माणसं तळमळताना पाहू शकत नाही- उद्धव ठाकरे

0
165

मुंबई : शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या प्रश्नांना रोखठोक उत्तर देताना दिसत आहेत.

या टीझरमध्ये, मी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प नाही. माझ्या डोळ्यांसमोर माझी माणसं तळमळताना पाहू शकत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. टीझरमध्ये उद्धव ठाकरे अंतिम वर्षाच्या परीक्षेवरदेखील उत्तर देताना दिसत आहेत. मात्र, त्यांचं सविस्तर उत्तर संपूर्ण मुलाखत प्रदर्शित झाल्यावरच बघायला मिळेल.

दरम्यान, सरकार म्हणून आम्ही परीक्षा घेणार. परीक्षा व्हावी असं माझंही मत आहे. पण…”, असं उद्धव ठाकरे टीझरमध्ये बोलताना दिसले. ही संपूर्ण मुलाखत या आठवड्याच्या शेवटी 25 आणि 26 जुलै रोजी सामनातून प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

देवेंद्र फडणवीस यांना अमृता फडणवीसांकडून खास शुभेच्छा; म्हणाल्या…

कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवणारच; राज्य सरकारने काढलेल्या जीआरवर प्रविण दरेकरांची टीका

देशात ‘अमर,अकबर, अँथनी’ एकत्र राहू नयेत असं भाजपाला वाटतं- सत्यजीत तांबे

कोरोना अपयश लपवण्यासाठी भाजपकडून पायाभरणीचा कार्यक्रम- बाळासाहेब थोरात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here