Home महाराष्ट्र “शिंदे गटाचा राष्ट्रवादीला दणका; तब्बल 18 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत केला शिंदे गटात...

“शिंदे गटाचा राष्ट्रवादीला दणका; तब्बल 18 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत केला शिंदे गटात प्रवेश”

523

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आमदारांनतर शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात दाखल झाले आहे, अशातच आता शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजप आणि शिंदे गटातील प्रवेशाकडे कल वाढल्याचं पाहायला मिळतंय.

राष्ट्रवादीच्या 18 पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादीतील सर्व पदांचा व पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हे सर्व पदाधिकारी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. या 18 पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर सर्वांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे.

हे ही वाचा : पहाटेच्या शपथविधीवर अमृता फडणवीसांचं महत्वाचं विधान, म्हणाल्या…

दरम्यान, या वेळी शिंदे गटात दाखल झालेले सागर शितोळे यांनी राष्ट्रवादी पक्षाला आपल्यासह 18 पदाधिकाऱ्यांनी रामराम ठोकल्याचं जाहीर केलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राष्ट्रवादीचा ‘तो’ पाचवा नेता अजित पवार नाही; भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी स्पष्टच सांगितलं

“मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही”

“माझी निष्ठा उद्धव ठाकरेंच्या पायाशी, मरेपर्यंत ठाकरेंसोबत राहणार; ‘या’ आमदारानं बंडखोरीच्या चर्चा फेटाळल्या”