Home महाराष्ट्र “मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही”

“मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिंदे सरकारने सण व उत्सवांवरील निर्बंध हटवले आहेत. यामुळे राज्यभरात मोठ्याने दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवाचं जोरदार आयोजन करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता  टेंभी नाक्यावरील दहीहंडीच्या उत्सवामध्ये शिंदे गटाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी केली आहे.

मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, कधीच नाही. शिवसेनेला जागा कमी पडत  असतील तर राष्ट्रवादी सोबत जाणार का? असा प्रश्न उपस्थित करत शत्रू हा शत्रूच असतो, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली.

हे ही वाचा : “माझी निष्ठा उद्धव ठाकरेंच्या पायाशी, मरेपर्यंत ठाकरेंसोबत राहणार; ‘या’ आमदारानं बंडखोरीच्या चर्चा फेटाळल्या”

दरम्यान, ठाण्यात मानाची समजली जाणारी टेंभी नाक्यावरील दहीहंडी उत्सवाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. या नाक्यावरील दहीहंडी उत्सव हा आनंद दिघे यांनी सुरू केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या उत्सवाला विशेष उपस्थिती लागणार आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राष्ट्रवादीच्या 5 मोठ्या नेत्यांना ईडीची नोटीस येणार, ‘या’ भाजप खासदाराचं मोठं वक्तव्य

काहीही झालं तरी, अखेरच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंसोबतच राहणार; कोल्हापूरच्या ‘या’ माजी आमदाराची ग्वाही

 भाजपच्या ‘या’ नेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होणार, दिल्ली हायकोर्टाचे आदेश