“शिंदे गटाचा शिवसेनेला पुन्हा दणका; ‘या’ आक्रमक महिला नेत्या करणार शिंदे गटात प्रवेश?”

0
850

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. यानंतर अनेकांचा शिंदे गटात जाण्याचा कल वाढला. अशातच शिवसेनेच्या आणखी एक आक्रमक महिला नेत्या या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार रश्मी बागल या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समोर येत आहे. शिंदे गटातील नेते तसेच राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी रश्मी बागल यांचे कट्टर विरोधक आणि शिंदे गटासोबत असलेले माजी आमदार नारायण यांना एकत्र आणल्याची चर्चा आहे. या दोघांना आदिनाथ कारखान्यात एकत्र काम करण्याची सूचना सावंत यांनी केली आणि या दोघांनी ती मान्य केली आहे. त्यामुळे बागल या शिंदे गटात प्रवेश करणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

हे ही वाचा : सायरस मिस्त्रींच्या कारला अपघात कसा झाला?; प्रत्यक्षदर्शीनं दिली घटनेविषयी माहिती, वाचा, नेमकं काय घडलं?

दरम्यान, रश्मी बागल यांनी आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहोत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहोत, याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका अद्याप घेतलेली नाही.

महत्त्वाच्या  घडामोडी –

सदस्य संख्या इतकी वाढवा की…; उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

‘…या कराणामुळे एकनाथ शिंदे चिंतेत’; उद्धव ठाकरे घेणार पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ?

“राष्ट्रवादीचा मोठा डाव; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here