Home महाराष्ट्र सायरस मिस्त्रींच्या कारला अपघात कसा झाला?; प्रत्यक्षदर्शीनं दिली घटनेविषयी माहिती, वाचा, नेमकं...

सायरस मिस्त्रींच्या कारला अपघात कसा झाला?; प्रत्यक्षदर्शीनं दिली घटनेविषयी माहिती, वाचा, नेमकं काय घडलं?

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं आज अपघाती निधन झालं. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांचं जागीच निधन झालं. तसेच या अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हा अपघात नेमका कसा घडला?, याची माहिती अपघात स्थळावरील प्रत्यक्षदर्शी व्यक्तीनं दिली आहे. प्रत्यक्षदर्शीने एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधत या घटनेविषयी माहिती दिली.

हे ही वाचा : सदस्य संख्या इतकी वाढवा की…; उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

सायरस मिस्त्री यांची कार एक महिला चालवत होती. ही कार डाव्या बाजुने अन्य एका कारला ओव्हर टेक करत होती. याचवेळी पुलावर असणाऱ्या दुभाजकाला ही कार धडकली. या घटनेत सायरस मिस्त्री यांच्यासह अन्य एकाचा जागीच मृत्यू झाला. चालक 5 ते 10 मिनिटांनी लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

‘…या कराणामुळे एकनाथ शिंदे चिंतेत’; उद्धव ठाकरे घेणार पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ?

“राष्ट्रवादीचा मोठा डाव; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज ठाकरे यांची भेट होणार की नाही? ; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…