Home नाशिक “शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचं कोरोनामुळं निधन”

“शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचं कोरोनामुळं निधन”

नाशिक : शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळं निधन झालं आहे. आज पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

कल्पना पांडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर नाशिकमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

नाशिक महापालिका निवडणुकीत त्या सलग 4 वेळा निवडून आल्या होत्या. तसेच नाशिक महापालिकेतील अनेक समित्यांवरही त्यांनी काम केलं आहे.

दरम्यान, कोरोना काळात त्यांनी रुग्णाला रुग्णालय मिळवून देणं, औषधांची सोय करणं, जनजागृती करणं, यासारखी अनेक महत्त्वाची कामं केली.

महत्वाच्या घडामोडी –

पृथ्वी- शिखरच्या खेळीपूढे चेन्नईचे गोलंदाज फेल; दिल्लीचा चेन्नईवर 7 विकेटवनी विजय

महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांच्या लाॅकडाऊनची शक्यता; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले संकेत

जनतेमधील उद्रेक लक्षात घेऊन नागरिकांच्या दृष्ठीने निर्णय घ्यावा लागेल- देवेंद्र फडणवीस

फक्त लॉकडाऊन केलं, की आपलं कार्य संपलं असा विचार सरकारने करू नये- सुधीर मुनगंटीवार