Home महाराष्ट्र महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांच्या लाॅकडाऊनची शक्यता; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले संकेत

महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांच्या लाॅकडाऊनची शक्यता; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले संकेत

मुंबई : कोरोनाचा उद्रेक रोखून साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत.

यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, दुसरा पर्याय नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात तब्बल सव्वा दोन तास चर्चा या बैठकीत झाली.

दरम्यान, लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. याशिवाय सर्वांच्या सूचना ऐकल्या, चांगल्या आहेत. पण निर्बंध आणि सूट दोन्ही एकाचवेळी शक्य नाही. येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

जनतेमधील उद्रेक लक्षात घेऊन नागरिकांच्या दृष्ठीने निर्णय घ्यावा लागेल- देवेंद्र फडणवीस

फक्त लॉकडाऊन केलं, की आपलं कार्य संपलं असा विचार सरकारने करू नये- सुधीर मुनगंटीवार

कोरोना रूग्णांचा आकडा आटोक्यात आणण्यासाठी लाॅकडाऊन आवश्यक- अशोक चव्हाण

“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत ठाकरे सरकार चालणार”