हिंदूहृदयसम्राट नको मराठी हृदयसम्राट म्हणा; घाटकोपरमधील घोषणाबाजीवरून राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

0
1173

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं जोरदार कंबर कसली असून पक्षाने मोर्चेबांधणी देखील जोरदार सूरू आहे.

अशातच काल घाटकोपरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मोठी बॅनरबाजी केली होती. तसेच महत्त्वाचं म्हणजे या बॅनरवर राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट असा उल्लेख करण्यात आला. तसेच कार्यकर्ते फक्त बॅनरबाजीवरच थांबले नाहीत.

हे ही वाचा : ईडीची भिती दाखवता काय?; पण लक्षात ठेवा, आम्ही…; गुलाबराव पाटलांचा भाजपला इशारा

राज ठाकरे जेंव्हा मनसे कार्यालयाच्या उद्घाटनासाठी घाटकोपरमध्ये पोहोचले तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीत ‘हिंदूहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो…’ ही घोषणा घुमत होती! यावरून आता राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आदेश दिला आहे,

हिंदूहृदयसम्राट नको मराठी हृदयसम्राट म्हणा, असा आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला. गेल्या अनेक दशकांपासून देशात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढेच हिंदूहृदयसम्राट अशी उपाधी लावली जात होती. भाजपच्याही कुठल्या नेत्याच्या नावापुढे आजवर हिंदूहृदयसम्राट लावण्यात आलं नाही. मात्र, मनसेनं हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर आता त्यांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट लावण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

महत्वाच्या घडामोडी –

राणेंना शिवसेनेचा पुन्हा दणका; कुडाळ नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला; विजयानंतर शिवसैनिकांनी केला कोंबडा डान्स

“वर्ध्यात राष्ट्रवादीचा मनसेला दणका, तब्बल ‘इतक्या’ पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ”

शाळेत जाताना शाळेचा गणवेशच हवा, उद्या कोणीही उठून काहीही करेल- तृप्ती देसाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here