Home क्रीडा संजूची सॅमसनची खेळी व्यर्थ; दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 9 धावांनी विजय

संजूची सॅमसनची खेळी व्यर्थ; दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 9 धावांनी विजय

236

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला एकदिवसीय सामना लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर झाला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे प्रत्येकी 40 षटकांच्या झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 4 बाद 249 धावा केल्या.

विजयासाठी मिळालेल्या 250 धावांचा पाठलाग करताना श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर व संजू सॅमसन यांनी संघर्ष केला. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामीवीर शुबमन गिल आणि शिखर धवन त्रिफळाचीत झाले. त्यांनी अनुक्रमे 4 आणि 3 धावा केल्या. त्यानंतर ऋतुराज गायकवाड पदार्पणात फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने 42 चेंडूत 19 धावा केल्या.

हे ही वाचा : ‘या’ दिवशी शिंदे-ठाकरे येणार एकत्र?; मुहूर्त ठरला अन् ठिकाणही…

श्रेयस अय्यरने 37 चेंडूत 50 धावांची शानदार खेळी केली. पण तो बाद झाल्यानंतर मात्र धावगती वाढत गेली आणि संजू सॅमसन याने त्याची सर्वोत्तम धावसंख्या केली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

दरम्यान, संजू  सॅमसनने 63 चेंडूत 86 धावा केल्या. अष्टपैलू शार्दूल ठाकूरने 31 चेंडूत 33 धावा केल्या. त्या दोघांनी मिळून 93 धावांची भागीदारी केली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“भाजपचा काँग्रेसला दणका; ‘या’ 3 मोठ्या नेत्यांसह 200 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश”

खंजीर खुपसण्याची उद्धव ठाकरेंची जुनी सवय; मनसेचा हल्लाबोल

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना कार्यालयाला दिली भेट; राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण