Home पुणे ‘या’ दिवशी शिंदे-ठाकरे येणार एकत्र?; मुहूर्त ठरला अन् ठिकाणही…

‘या’ दिवशी शिंदे-ठाकरे येणार एकत्र?; मुहूर्त ठरला अन् ठिकाणही…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राज्यात सध्या शिंदे आणि ठाकरे असे दोन गट आमनेसामने आले आहेत. मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांनी काल दसरा मेळाव्याचं निमित्त साधत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप देखील करण्यात आले. अशातच या राजकीय घडामोडी घडत असताना सोशल मीडियावर सध्या एक लग्नपत्रिका चांगलीच व्हायरल होत आहे.

शिंदे आणि ठाकरे परिवाराच्या दिलजमाईची ही पत्रिका आहे. दरम्यान, एकीकडे या दोन्ही गटात राजकीय वातावरण तापलेलं असताना आता शिंदे-ठाकरे कुटुंबियांच्या दिलजमाईच्या पत्रिकेमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य पहायला मिळत आहे.

हे ही वाचा : “भाजपचा काँग्रेसला दणका; ‘या’ 3 मोठ्या नेत्यांसह 200 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश”

जुन्नर तालुक्यातील वडगावसहाणी गावचे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आणि सरपंच तसेच निष्ठावंत शिवसैनिक श्री खंडेराव विश्राम शिंदे यांचे पुतणे चिंरजीव विशाल आणि आंबेगाव तालुक्यातील साल गावच्या ठाकरे परिवाराची सुकन्या चि. सौ. का. अनुराधा यांचा शुभविवाह 8 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. त्यांच्या लग्नपत्रिकेमुळे पुणे जिल्ह्यात सध्या शिंदे व ठाकरे यांच्या नव्या नातेसंबंधामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये या सध्याच्या राजकीय तणावाच्या वातावरणातही लग्नपत्रिका पाहून चेहर्‍यावर आनंद पहायला मिळत आहे. 

महत्त्वाच्या  घडामोडी –

खंजीर खुपसण्याची उद्धव ठाकरेंची जुनी सवय; मनसेचा हल्लाबोल

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना कार्यालयाला दिली भेट; राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण

 राजसाहेब ते राजसाहेब, अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा वाघ लागतो; मनसेचा शिंदेंना टोला