Home क्रीडा राहूल टेवाटिया व संजू सॅमसन यांची दमदार अर्धशतके; राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबवर...

राहूल टेवाटिया व संजू सॅमसन यांची दमदार अर्धशतके; राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबवर धमाकेदार विजय

दुबई : आयपीएलच्या आजच्या राजस्थान रॉयल्स विरूद्ध किंग्स इलेव्हन पंजाबच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्स इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्सचा  धावांनी पराभव केला.

किंग्स इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 विकेट गमावत 223 धावा केल्या. किंग्स इलेव्हन पंजाबने दमदार सुरूवात केली. सलामीला आलेल्या के.एल.राहूल व मयंक अगरवालने पंजाबला आक्रमक सुरूवात करून दिली आहे. दोघांनी 16.3 षटकात 183 धावांची सलामी दिली.  फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात मयंक व राहूल दोघेही आऊट झाले. मयंकने 50 चेंडूत 106 धावा केल्या. ज्यात त्याने 10 चाैकार व 7 षटकार मारले. तर कर्णधार राहुलने 54 चेंडूत 69 धावा केल्या. जात 7 चाैकार व 1 षटकार मारले. नंतर मॅक्सवेल व निकोलस पूरनने फटकेबाजी करत संघाची धावसंख्या 223 वर नेली.

धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरूवात खराब झाली. जाॅस बटलर केवळ 4 धावांवर बाद झाला. नंतर आलेल्या कर्णधार स्टिव्ह स्मिथ व संजू सॅमसनने डाव सावरत 9 व्या षटकात धावसंख्या 100 वर नेली. नंतर स्मिथ आऊट झाला. स्मिथने 27 चेंडूत 50 धावा केल्या. ज्यात 7 चाैकार व 2 षटकाराचा समावेश होता. संजू अजून मैदानावर होता. यादरम्यान संजूने आपले अर्धशतक पूर्ण केले. फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात संजूही आऊट झाला. मोहम्मद शमीने त्याला आऊट केले. संजूने 42 चेंडूत 85 धावा केल्या. ज्यात त्याने 4 चाैकार व 7 षटकार मारले. नंतर आलेल्या राहूल टेवाटिया व राॅबीन उथप्पाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. राहूल टेवाटियाने 18 व्या षटकात शेल्डन काॅट्रेलला 5 षटकार खेचत 30 धावा वसूल केल्या. राजस्थानला शेवटच्या 2 षटकात 21 धावांची गरज होती. शमीच्या पहिल्या चेंडूवर उथप्पा आऊट झाला. तर पुढच्या 2 चेंडूवर जोफ्रा आर्चरने 2 षटकार मारत सामन्यात रंगत आणली. तर पुढच्या चेंडूवर 1 रन निघाली. तर पुढच्या चेंडूवर षटकार मारत राहूलने आपले अर्धशतक पूर्ण केले. राहूलने 31 चेंडूत 53 धावा केल्या. नंतर पुढच्या चेंडूवर राहूल आऊट झाला. आता शेवटच्या षटकात 2 धावांची गरज होती. मुरूगन अश्विनने पहिला चेंडू डाॅट घालवला. तर पुढच्या चेंडूवर विकेट घेत सामन्यात रंगत आणली. पण पुढच्या चेंडूवर कुरेनने चाैकार मारत राजस्थानला विजय मिळवून दिला.

दरम्यान, पंजाबकडून मोहम्मद शमीने 3, शेल्डन काॅट्रेल, निशम, मुरूगन अश्विने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

“ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज एलिसा हिली हिनं मोडला महेंद्रसिंग धोनीचा विक्रम”

मयंक अगरवालचे शानदार शतक; पंजाब चांगल्या स्थितीत

के.एल.राहूल आणि मयंक अगरवालची नाबाद शतकी भागीदारी; किंग्स इलेव्हनची जोरदार सुरूवात

“महाविकास आघाडीशी सरकार बनविणे ही शिवसनेची मजबुरी आहे का?; याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं”