संजय राऊत म्हणाले, सोमय्या वेडा झालाय; आता किरीट सोमय्या, म्हणतात…

0
270

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : वेडे झाले आहेत. पागल आहेत ते. त्यांना स्वप्नातही त्यांना स्वत:ची बेनामी मालमत्ता दिसत आहे, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. राऊतांच्या या टीकेवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पलटवार केला आहे.

होय, आहे मी ध्येयवेडा. सरकारचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी आणि राज्यातील साडेबारा कोटी जनतेच्या हितासाठी ध्येयवेडा व्हावे लागले तर होईल ध्येयवेडा, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रापुरता पक्ष; भाजपच्या ‘या’ आमदारांनी NCP ला डिवचलं

मी ठाकरे सरकारच्या 18 नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले. शिवसेनेच्या खासदार भावना गवळीचा पार्टनर जेलमध्ये गेलाय. आनंद अडसूळांच्या नावाने वॉरंट आहे. अनिल परब यांचा रिसोर्ट बेकायदेशीर ठरला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे. प्रताप सरनाईक खोटं बोलत होते. त्यांना सरकारने टॅक्स माफ केला आहे. हसन मुश्रीफांच्या जावयाच्या बेनामी कंपनीला दिलेलं 1500 कोटीचं दिलेलं कंत्राट रद्द झालं आहे. अनिल देशमुख आत आहेत. म्हणजे मी जे बोलत होतो ते सिद्ध होत आहे, असंही किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

दरम्यान, वेडं झाल्याशिवाय हे काम होत नाही. मी जर ध्येयवेडा असेल तर साडेबारा कोटी जनतेसाठी ध्येयवेडा व्हायला तयार आहे, असंही किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेचा भाजपला धक्का; ‘या’ 5 नगरसेवकांनी हाती बांधलं शिवबंधन”

“जळगावमध्ये शिवसेनेचा राष्ट्रवादीला धक्का, बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला”

किरीट सोमय्या वेडा माणूस, स्वत: तुरुंगात जाण्याचा मार्ग शोधत आहे ; संजय राऊतांची टोलेबाजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here