Home महाराष्ट्र माफी मागितली म्हणजे सरकारने चुक केल्याचं मान्य केलं ;रोहित पवार यांचा राज्य...

माफी मागितली म्हणजे सरकारने चुक केल्याचं मान्य केलं ;रोहित पवार यांचा राज्य सरकारवर निशाणा

160

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नंदुरबार : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद राज्यात उमटले आहेत. या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.

सरकार एकीकडे माफी मागत आहे. मात्र संबंधित मंत्री अजूनही राजीनामा देत नसल्याने सरकार हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. सरकारने अधिकाऱ्यांच्यामार्फत या घटनेची चौकशी करण्यापेक्षा या घटनेची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

ही बातमी पण वाचा : “मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 5 सर्वात मोठ्या घोषणा”

जालना येथील लाठीमार घटनेवर सरकारने माफी मागितली. म्हणजे सरकारने चुकी केल्याचे मान्य केली आहे. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. असं रोहित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, सरकार सर्वच आघाडीवर अपयशी ठरत असल्याचा घणाघात रोहित पवार यांनी यावेळी केला आहे.ते नंदुरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळाव्यात बोलत होते.

महत्त्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरे अंतरवाली-सराटीत दाखल, दाखल होताच ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले…

मराठा बांधवांवरील लाठीचार्जवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, माझी तमाम मराठा बांधवांना विनंती आहे की…

…तुमचेही तुरूंगात जाण्याचे दिवस येणार; उध्दव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल