Home छत्रपती संभाजीनगर उद्धव ठाकरे अंतरवाली-सराटीत दाखल, दाखल होताच ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले…

उद्धव ठाकरे अंतरवाली-सराटीत दाखल, दाखल होताच ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जालना : जालना येथे मराठा आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह काहीजण उपोषणाला बसले होते.

पण, पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आंदोलनस्थळी दगडफेक झाली. तर, पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर जालन्यात बसेसची जाळपोळ करण्यात आली. या सर्व प्रकरणानंतर आता उद्धव ठाकरे हे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे हे दाखल झाले आहेत.

ही बातमी पण वाचा : मराठा बांधवांवरील लाठीचार्जवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, माझी तमाम मराठा बांधवांना विनंती आहे की…

यावेळी आंदोलनकर्त्यांशी उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. मराठा समाजाच्या मागणी काही नव्याने आल्या नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये समाजाचा आदर ठेवून न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लाठीचार्ज झाला नव्हता. लढा सुरू असताना आझाद मैदानावर उपोषण केलं गेलं होतं. मुख्यमंत्री या नात्याने व्हिडीओ कान्फरन्सिंगने चर्चा केली होती., असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, राज्यभरातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोललो. त्यानंतर तुमच्या भेटीला आलो. केंद्र सरकारने गणपतीच्या दिवसात संसदेचे अधिवेशन ठेवले आहे. मराठा समाजाला न्याय द्या. धनगर, ओबीसी समाजाला न्याय द्या. एक फूल आणि दोन हाप सरकारचं काम शून्य आहे. काम काही नाही. पण, सरकार आपल्या दारी. सरकारमध्ये असताना आम्ही तुम्हाला भेटत होतो. आता कोणीही नाही, तरी माणुसकीच्या नात्याने तुम्हाला भेटायला आलो आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

…तुमचेही तुरूंगात जाण्याचे दिवस येणार; उध्दव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जवर, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“मोठी बातमी! जालन्यात मराठा आंदोलकांवर, पोलिसांकडून लाठीचार्ज”